
भारतामध्ये मधुमेहाची सुनामी येत असून २०३० पर्यंत प्रत्येक ४-५ व्यक्तींमागे एक जण मधुमेही असेल.
ICMR च्या अहवालानुसार ग्रामीण भागात निदान कमी प्रमाणात होते, त्यामुळे अनेक रुग्णांना आजार वेळेवर कळत नाही.
१० वर्षे अनियंत्रित मधुमेह राहिल्यास हृदयविकार, किडनी फेल्युअर, अंधत्व आणि पाय कापावा लागण्यासारखे गंभीर परिणाम होतात. डॉक्टरांची भूमिका प्रामुख्याने तत्काळ उपचारांपुरती मर्यादित असून दीर्घकालीन व्यवस्थापन रुग्णावरच सोडले जाते.
हे पुस्तक मधुमेही, त्यांचे कुटुंबीय, डॉक्टर, नर्सेस ते सामान्य वाचक अशा सर्वांसाठी लिहिलेले आहे. प्रत्येक प्रकरणात संवाद, प्रश्नोत्तर व चित्रे देऊन माहिती सोप्या भाषेत आणि समजण्याजोगी पद्धतीने मांडली आहे.
पुस्तकाची प्रस्तावना पहा.
आणि ऐका
“माझा मधुमेह, माझे नियंत्रण” या पुस्तकातील मूळ आशयावर आधारित, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनांचा (AI tools) वापर करून हे ऑडिओ व्हिडिओ तयार केले आहेत.
२१५ पृष्ठांच्या व्यापक अभ्यासातून तयार केलेली प्रकरणे वैज्ञानिक संशोधनावर आधारित आहेत . खालील लिंकसवर क्लिक करून प्रत्येक प्रकरणाचा संक्षिप्त व्हिडिओ पाहा. सविस्तर पॉडकास्ट ऐका आणि सारांश वाचा .
मधुमेहाचे प्रकार, शरीरातील ग्लुकोज प्रक्रियेची मूलभूत माहिती आणि विज्ञान.
मधुमेहाचा मानसिक आरोग्यावर प्रभाव आणि सकारात्मक दृष्टीकोन.
पुस्तक खरेदी करा
पूर्ण पुस्तकात सर्व अध्याय आणि अधिक माहिती उपलब्ध आहे. खालील लिंकवर क्लिक करून पुस्तक खरेदी करा.
FAQ
- प्रश्न: मी प्रकरणातील ऑडिओ कुठे ऐकू / पाहू शकतो?
- उत्तर: प्रत्येक प्रकरण पृष्ठावर ऑडिओ / विडियो ब्लॉक आहे; प्ले बटणावर क्लिक करा.
- प्रश्न: मी संपूर्ण पुस्तक कुठे मिळवू शकतो?
- उत्तर: पुस्तक खरेदी लिंकवर क्लिक करून Amazon वरून खरेदी करा.
- प्रश्न: सर्व सामग्री मोफत का उपलब्ध आहे?
- उत्तर: आम्ही मधुमेहाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हे ज्ञान मोफत प्रदान करतो.


















